कोल्हापूर : दुधाळी मैदानाची झालेल्या दुरावस्थेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विराज चिखलीकर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
दुधाळी परिसरातील दुधाळी मैदान व व्यायाम शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. येथे येणाऱ्या खेळाडू व ज्येष्ठ नागरिकयांची गैरसोय होत आहे. व्यायामशाळेची इमारत पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर आहे,इमारतीचा स्लॅब लिकेज आहे,येथील असलेला टेनिस कोर्ट पण पुर्णपणे खराब झालेला आहे.इमारतीची पूर्णपणे पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे.
मैदानाच्या साईट असलेल्या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे,लाईटची सोय नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेस मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे,त्यांच्या कचऱ्यामुळे, बाटल्यांमुळे सकाळी खेळणाऱ्या खेळाडूंना त्रास होतो.तरी आपण समक्ष भेट देऊन या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी अतिरिक्त आयुक्तांना, भाजपा उत्तरेश्वर मंडल तर्फे मागणी करण्यात आली.
यावेळी विराज चिखलीकर, सतीश पाटील-घरपणकर सुनील पाटील, अमेय भालकर,राजु माने,अक्षय आळवेकर,मयुर कदम, चेतन शिंगटे,ओंकार गोसावी, अनीकेत अतीग्रे बालाजी चौगले या सह कार्यकर्ते उपस्थित होते.