ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोर्ड परिक्षेबरोबर शाळेच्या सर्वच परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्याची वृत्ती ठेवल्यास शिक्षण स्तर सुधारेल : डी. एस. योवार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

क्रमिक पुस्तकांबरोबर जीवनाचे शिक्षण देणारे शिक्षण अध्यापनातून द्यावे. बोर्ड परिक्षेबरोबर शाळेच्या सर्वच परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्याची वृत्ती ठेवल्यास शिक्षण स्तर सुधारेल. यासाठी शाळेच्या सर्व घटकांनी सहकार्य करावे. असे आवाहन कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव डी. एस. योवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रमुख संयोजनाखाली सदाशिवराव मंडलिक कॉलेजवर कागल, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या संयुक्त सभेमध्ये ते बोलत होते.

नव्या जगात शिक्षक व मुख्याध्यापकांनी टेक्नोसेव्ही व अपडेट असावे. आपण चांगले असलो की आपोआप शाळा टिकणार आहे, ही भावना शिक्षकांनी मनी बाळगण्याची गरज प्रतिपादन करून ज्ञानाबरोबर आपल्याजवळ कौशल्य असणे आवश्यक असल्याचे सांगत आनंद घेऊन काम करण्याची वृत्ती ठेवा. असे आवाहनही यावेळी बोलताना पवार यांनी केले.

‘जय शिवराय’चे संस्थापक दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी माध्यमिक विभागाचे वरिष्ठ अध्यक्ष सुधीर हावळ, दीपक पवार आणि मनोज शिंदे, जय शिवरायचे कार्यवाह आण्णासो थोरवत, सदाशिवराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह गृहरक्षक दलाचा सुवर्ण पुरस्कार प्राप्त जी. के. भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

वरिष्ठ अधिक्षक़ सुधीर हावळ यांनी विद्यार्थ्यांकडून भरावयाचे बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरताना घ्यावयाची काळजी, वरिष्ठ अधिक्षक़ दिपक पोवार यांनी परीक्षार्थांच्या नोंदीतील दुरुस्ती, फॉर्म फि आदीविषयी, मनोज़ शिंदे यांनी मान्यता नुतनीकरण, कॉपी प्रतिबंध, केदसंचालकाची जबाबदारी, परीक्षा केंद्र संचलन, परीक्षाकाळात अवैध साधनांच्या वापरास प्रतिबंध याविषयी माहिती दिली. सदाशिवराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी राज्यकर्त्यांच्या शैक्षणिक धोरणाविषयीच्या अनास्थेबाबत खेद व्यक्त केला. तर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठीच्या बेमुदत संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, कागल तालुका अध्यक्ष ए. आर. कुंभार, रधानगरी तालुका अध्यक्ष एस. के. पाटील, भुदरगडचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, एस. एन. आंगज, सुनील मंडलिक, एल. व्ही. शर्मा यांच्यासह कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

स्वागत आणि प्रास्ताविक शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले. आभार उपप्राचार्य रवींद्र शिंदे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks