ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीला पाणी कमी पडू देणार नाही : आमदार प्रकाश आबिटकर यांची ग्वाही ; थेट विमोचक बसविण्यास प्रारंभ

डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेल इतक्या पाण्याचा विसर्ग कालव्यावर बसवलेल्या गेटमधून होईल.शेतीला पाणी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. ते तळाशी (ता. राधानगरी) येथे कालव्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेट बसवण्याच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते.

दुधगंगा धरणाच्या डाव्या कालव्यावरील तुरंबे, तिटवे,अर्जुनवाडा,तळाशी,शेळेवाडी,मांगोली, ठिकपुर्ली या ठिकाणी आ.आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर झालेल्या थेट विमोचक बसवण्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी आ.आबिटकर म्हणाले,मागील वर्षी दुधगंगा डाव्या कालव्यावरील शेतीला पाणी कमी पडत असल्याची मागणी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.

त्यांच्या मागणीची दखल घेत कालव्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेट बसवुन शेतीला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज पूर्ण झाले. काळम्मावाडी धरण व कालव्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत.त्यांना शेतीसाठी पाणी मुबलकप्रमाणात पुरवण्याची जबाबदारी आमची असून कोणत्याही परिस्थितीत शेतीला पाणी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास आ. आबिटकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी उपअभियंता प्रवीण पारकर,सहायक अभियंता अजिंक्य पाटील,माजी उपसभापती अरुणराव जाधव, ज्येष्ठ नेते शामराव भावके,सुभाष पाटील मालवेकर,शहाजी पाटील,राजू वाडेकर, आनंद भोईटे, सुरेश देवर्डेकर,डी.पी पाटील, सुनील घारे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks