ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सानिका स्पोर्ट्सच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड ता. कागल येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मंडळाच्या अध्यक्षपदी रतन जगताप, उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे यांची एक मतांनी निवड झाली.निवड समितीच्या अध्यक्षपदी निवास कदम होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हनुन पांडुरंग कुडवे उपस्थित होते.

यावेळी खजिनदारपदी सागर सापळे ,सचिवपदी निशांत जाधव , संपर्कप्रमुखपदी जगदिश चितळे यांची निवड करण्यात आली.

सानिका स्पोर्ट्स यांच्यावतीने दरवर्षी शालेय विद्यार्थी ,गरीब होतकरू ,अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते.तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

या कार्यक्रमाचे स्वागत विनायक मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक सानिका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.

यावेळी विकी बोरगावे , राजेंद्र सावंत ,सुरज मुसळे ,भाजप मुरगूड शहर अध्यक्ष अमर चौगुले, नगरसेवक शिवाजी इंदलकर , पांडुरंग पुजारी ,अमित पाटील , रमेश भोई ,संजय वारके ,राजू डवरी ,अरविंद नरके ,दिलीप मांगले ,आशिष फर्नांडिस ,गणेश तोडकर ,भैय्या कुडवे ,अजित राजिगरे ,आलोक चव्हाण, तुषार डेळेकर आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन विकी बोरगावे यांनी केले .तर आभार रणजित मोरबाळे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks