…..तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावं लागेल ; ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांचा इशारा

शुक्रवारी मध्यरात्री माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राजेंद्र वरपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे . याप्रकरणी राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आले.दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठ इथं माजी आमदार क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवून राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालेयत .
त्याच कुटूंबातील एका भयभीत व्यक्तीनं आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळेल या अपेक्षेनं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. मात्र, नेहमीप्रमाणे चौकशी करून कारवाई करतो हे आश्वासन देऊन संबंधिताना परत पाठवल. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जर राजकीय दबावाखाली काम करणार असतील आणि सर्व सामान्य नागरीकांना न्याय देण्यास असमर्थ असतील तर त्यांना ताबडतोब निलंबीत करावं.
कोणी दहशत माजवली, कशासाठी मारहाण केली हे सर्व व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट झालंय. असं असतानाही चौकशी कसली करताय ?असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केलाय.त्या कुटूंबातील लोकांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना न्याय मिळणार काय ? हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट करावं. कायद्याचं राज्य आहे असं म्हणणाऱ्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यानी या गंभीर प्रकारामध्ये लक्ष घालावं आणि अशाप्रकारे सतत दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या माजी लोकप्रतिनिधीला दिलेले पद ताबडतोब काढून घ्यावं.
या गंभीर प्रकारामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा ठाकरे गटानं दिला.यापूर्वी सुध्दा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय घडलं हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलंय. एका मागासवर्गीय बांधवाला याच माजी लोकप्रतिनिधीनं मारहाण करतानाही सर्वांनी पाहिलंय.
अशा अनेक घटना घडून सुध्दा हि व्यक्ती जर मोकाट सुटणार असेल, तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला .यावेळी ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, सुनिल मोदी,विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक धनंजय सावंत,अवधूत साळोखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, दत्ताजी टिपूगडे, सुहास डोंगरे, दिपाली शिंदे, दिलीप देसाई, दिनेश साळोखे, अभिजीत पाटील, महेश उत्तुरे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, स्वरूप मांगले, विवेक काटकर, अभिजीत ओतारी, राजू सांगावकर,धनाजी यादव, विकी मोहिते, विनय क्षीरसागर, विजय नाईक, रुपेश रोडे आदी उपस्थित होते.