शिवाज्ञा गडसंवर्धनकडून रांगणा किल्ला मार्गावर दिशादर्शक फलक

पाटगाव : समीर मकानदार:
भटवाडी येथून रांगणा किल्ल्यावर जाणारा मार्ग हा डोंगर दरी, जंगलातून निसर्गरम्य वातावरणातून जातो, आणि हेच अनेक पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पण या मार्गावर नागरी वस्ती नसलेने अनेक नवीन पर्यटक किंवा शिवप्रेमी रस्ता चुकतात. हे ओळखून शिवाज्ञा गडसंवर्धन परिवाराने या मार्गावर दिशादर्शक फलक लावून शिवरायांच्या आज्ञेचे पालन केले, त्यांच्या या दिशादर्शी उपक्रमाबद्दल गडप्रेमीतून व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.
रांगणा किल्ला हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असून या किल्ल्यावर जाण्यासाठी गारगोटी- कडगाव-पाटगाव मार्गे जावे लागते. पाटगाव गावानंतर रस्ता जंगल व डोंगर दरीतून जातो. या मार्गावर नागरी वस्ती नसलेने स्थानिकांना मार्ग विचारता येत नाही. त्यामुळे नवीन पर्यटकांना रस्ता चुकण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गडप्रेमी रस्ता चुकून रांगणा किल्ल्यावर जाण्याऐवजी हनमंता या गावाकडे गेले व वाटेवर त्यांचा अपघात झाला. अशी दुर्घटना होऊ नये, व पर्यटक तसेच गडप्रेमींना प्रसिद्ध अशा रांगणा किल्ल्यावर जाणे सुलभ व्हावे हे ओळखून शिवाज्ञा परिवाराने हे दिशादर्शक फलक लावून एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या आज्ञेचे पालनच केले आहे, त्यांच्या या दिशादर्शी कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी शिवाज्ञा परिवाराचे संस्थापक संदीप देसाई, गुरुनाथ वास्कर, अमोल सुतार, राम वास्कर, प्रथमेश हळदणकर, रामजय लाड, प्रतिक हळदणकर, अनिल देसाई, विवेक सुर्यवंशी, अर्जुन माधव,विश्वजित केने,संग्राम सुतार,आकाश पाटील, मोहन सुतार,रवींद्र खेतल,रोहन देसाई,अक्षय पाटील,युवराज भुतल, शशांक देसाई,संग्राम देसाई, सहदेव पाटील,किरण देसाई, अजिंक्य देसाई यांनी परिश्रम घेतले.