ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी मोठी उर्जा : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे, समरजीत सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन आम्ही देत आहोत.कागल मध्ये यापूर्वी असे कधीच घडले नाही.यानिमित्ताने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या लोककल्याणकारी कामांसाठी उर्जा आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथील महात्मा फुले वसाहतीत स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला संकल्प करुया, ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया’ उपक्रमांतर्गत ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांच्या वाटपवेळी ते बोलत होते.त्यापूर्वी, प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना थेट घरी जाऊन श्री घाटगे यांनी मंजुरी पत्रांचे वाटप केले.

श्री.घाटगे पुढे म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ देताना विरोधकांनी गटतट बघून काम केले.त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत.अशा लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना लाभ देत आहोत.विशेष म्हणजे आमचे कार्यकर्ते शासकीय योजनेचे लाभ कोणताही दबाव न आणता लाभार्थ्यांच्याकडून एकही रुपया न घेता मिळवून देत आहेत.आमचे युवा कार्यकर्ते या विधायक कार्यात गुंतले आहेत.आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.

यावेळी माजी नगरसेविका, लक्ष्मी सावंत,उषा सोनुले,शाहूचे संचालक यशवंत ऊर्फ बाॕबी माने,सतीश पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक राजेंद्र जाधव,उमेश सावंत,अरुण गुरव,आदी उपस्थित होते.

यावेळी त्रिशला सोनुले,धीरज घाटगे,अक्षय घस्ते यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत शुभम सोनुले यांनी केले.सुरेश पिष्टे यांनी आभार मानले

फरक कामाच्या पद्धतीतील…!

विरोधकांनी बहुजन समाजाकडे माणूस म्हणून न बघता मतदार म्हणून पाहिले व तशी वागणूकही दिली.आम्ही मात्र गटतट न पाहता त्याची गरज पाहून काम केले.विशेष म्हणजे गत निवडणुकीत आम्हाला मतदानही न केलेल्या व्हनुर येथील एकाच कुटुंबातील सात सदस्यांचे जातीचे दाखले मोफत काढून दिले.हाच विरोधक व आमच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे.असे श्री.घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks