ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे

करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी मिळाल्यामुळे पालकमंत्री म्हणून हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद आणि समाधान आहे, असेही ते म्हणाले.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेने आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ४० कोटी रुपयांची तरतूद अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये केल्याबद्दल पालकमंत्री म्हणून या तिघांचेही आभार मानतो आणि अभिनंदन करतो.

या पत्रकात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार २००९ ला उपमुख्यमंत्री पदावर आणि अर्थ व नियोजन मंत्री असताना करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ५० कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी दहा कोटीच रुपये अर्थसंकल्पित झाले होते. ४० कोटी रुपये द्यावेत, अशी सातत्याची आणि आग्रही मागणीसाठी या तिन्ही नेत्यांकडे मी पालकमंत्री झाल्यानंतर सतत लकडा लावला होता. त्यानंतर या मागणीचा पुरवणी मागण्यांमध्ये समावेश झाल्यानंतर हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आणि समाधान आहे.

या जिल्ह्याचा पालक मंत्री झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे तीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन, असे जाहीर आश्वासन मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेला दिले होते. त्यापैकी; काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनळने पाणी दीपावलीच्या अभ्यंग स्नानासाठी आणणे हा प्रकल्प मार्गी लागला, पाणीही आले. आता लवकरच लोकार्पण समारंभ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे दिवंगत नेते, कोल्हापूरचे सुपुत्र माजी मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकरसाहेब यांनी कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली होती. छत्रपती प्रमिलाराजे ईस्पितळ म्हणजेच सीपीआर दवाखाना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल होते. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथे ३० एकर राखीव जागाही होती. ते सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची त्यांची इच्छा होती. परंतु; मूर्त स्वरूप आले नव्हते. या ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत.

या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होणार आहे. आणि आत्ता अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्णत्वाला जात आहे. मी पालकमंत्री झाल्यानंतर या तिन्ही गोष्टी पूर्णत्वाला जात आहेत, याचा मला मनापासून आनंद आणि समाधान आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks