ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगडात दोन्ही पाटलांन मध्ये पोस्टरवार

चंदगड प्रतिनिधी: अमोल गावडे

सध्या नागपूर येथे महाराष्ट्रचं हिवाळी अधिवेशन चालू आहे. राज्यातील विविध रखडलेल्या विकासकामंना गती मिळेल. मात्र मंजूर करून घेतलेल्या कामावरून चंदगड विधानसभेतील विद्यमान आमदार राजेश पाटील व भाजपचे शिवाजी पाटील यांच्यात सोसिअल मीडियावर पोस्टर वोर सुरु झाल्याच्या चर्चा रंगतं आहेत

मध्यंतरी राजकारणात उलथापालतं झालेल्या होत्या.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देणारे आमदार राजेश पाटील व भाजपचे चंदगड निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील हे दोघे ही सत्तेतं असलेल्या पक्षांचे भाग आहेत.

लोकसभा व विधानसभा काही दिवसावर येऊन ठेपलेल्या असतानाचं चंदगड विधानसभा मतदार संघात नेते कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. .सध्या नागपूर अधिवेशनात पहिल्या दिवशी 70 कोटीचा निधी उपलब्ध झाल्याचं आमदार राजेश पाटील यांच्याकडून सांगितलं जात आहे तर शिवाजी पाटील यांच्या कडून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून 19 कोटी 50 लाख मंजूर झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

मात्र या निधीवरून आमदारकीच्या रेस मध्ये असलेक्या या दोन्ही नेत्यामध्ये आता चंदगड मध्ये कोणी किती निधी आणला हे जनतेला सांगण्याची रेस लागलेली पाहायला मिळत आहेतं या वरूनच सध्या सोसिअलमीडिया वर कार्यकर्तेकडून पोस्टरवार रंगलेलं पाहायला मिळतंय.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks