ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल : आयुष्मान भारत गोल्डन कार्डचे मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप

कागल प्रतिनिधी :
कागल येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रम वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळेघोलला शंभर टक्के गोल्डन कार्ड पूर्ण केल्याबद्दल सरपंच शिरसाप्पा खतकल्ल, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरणे, डॉ. सिंग, आरोग्यसेविका सुरेखा सुतार, आरोग्यसेवक भगवान पाटील, आरोग्य सहायक एस. आर. पाटील, अविनाश वाघे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कापशी, चिखली, सिद्धनेर्ली, पिंपळगाव आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयकडील कर्मचारी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.