देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत अमित शहा यांचं मोठं वक्तव्य…

नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हैदोस घातलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. देशातील अनेक राज्यात गंभीर परिस्थिती आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही हे खरं नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
लसीकरणाबाबत वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा मोठ्या प्रमाणात असल्याने लढा देणं थोडं कठीण आहे पण मला विश्वास आहे की आपण त्यावर विजय मिळवू, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना अमित शहा यांनी राज्यांमधील लसीकरण तुटवड्यावरही आपलं मत मांडलं.
दरम्यान, पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही वेळ असला पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नसल्याचं शहा म्हणाले.