12 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गुटखा व तंबाखू च व्यवसाय सुरू करू देण्याकरिता तसेच कोणतीही कारवाई न करण्यासाठी 15 हजाराच्या लाचेची मागणी करून 12 हजार रूपयाची लाच घेणार्या पोलिस हवालदारास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
महादेव वसंतराव शिंदे (45, पद – पोलिस हवालदार, उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशन – असे लाच घेणार्या हवालदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देणे कामी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे ,अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे , पोलिस उप अधीक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राठोड ,पोलिस अंमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील आणि विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.