चंदगड : पार्ले येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
दि न्यु इंग्लिश स्कूल चंदगड येथील 1997- 98 या दहावीचा बॅचचा स्नेह मेळावा पार्ले येथे उत्साहात संपन्न झाला. स्नेहमेळाव्याचे आयोजन 25 वर्षानंतर करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक रामकृष्ण गडकरी यांनी केले.
त्यानंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे आपली मनोगत व्यक्त केली दहावीच्या कालखंडातील गमती जमती अनेक अनुभव त्यावेळी अनेकांनी सांगितले. दुपारच्या सत्रामध्ये गप्पा गोष्टी गाणी धमाल एकंदरीत आनंददायी उत्साही असा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन क्लासमेट ग्रुपचे सदस्य अनिल कांबळे यांनी केले होते.
कार्यक्रम हा पाटील वाडा पार्ले येथे आयोजित करण्यात आला होता. चंदगड ,शिरगाव, कानूर, पुणे ,मुंबई ,सासवड ,कोल्हापूर इत्यादी गावामधून विद्यार्थी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्या साठी उपस्थित राहिले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम केले व सदरचा कार्यक्रम हा धमाल मस्ती आणि आनंददायी असा पार पडला.आभार अनिल कांबळे यांनी मानले.