नागरदळे गावाला “यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार”

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नागरदळे (ता. चंदगड) गावाला शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी कोल्हापूर येथे जिल्हा परिषद मार्फत देण्यात येणारा “यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार” मा. राहुल पाटील (अध्यक्ष, जिल्हा परिषद) व मा. संजय सिंग चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामीण विकास व ग्रामीण स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून सगळीकडे अभिनंदन व कौतुक होत आहे.
यावेळी गावचे प्रथम लोकनियुक्त लोकसेवक सरपंच श्री दिलीप मारुती पाटील, उपसरपंच श्री रामू वैजु पाटील, सदस्य सागर यशवंत सोनार, राजू अशोक पाटील, सौ लक्ष्मी परशराम पाटील, सौ शोभा सुरेश पाटील, सौ प्रियंका संजय पाटील, सौ प्रेमा सुरेश सुतार तसेच ग्रामसेवक श्री भारत कापसे व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.