के.पी.पाटील यांच्या अभ्यासपूर्ण योगदानामुळे बिद्रीचा उत्कर्ष : संजयबाबा घाटगे ; मुरगुडमध्ये सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीची प्रचार सभा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बिद्री साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी के. पी. पाटील यांनी आयुष्याची पस्तीस ते चाळीस वर्षे खर्ची घातली आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण योगदानामुळे बिद्रीचा उत्कर्ष झाला. असे गौरवोद्गार माजी आ. संजयबाबा घाटगे यांनी काढले. मुरगूड येथे सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डी. डी. चौगले होते.
घाटगे म्हणाले, के. पी. पाटील यांनी आपल्या कुशल नियोजनामुळे बिद्रीचा प्रतिटन तोडणी वाहतूक दर व प्रतिक्विटल उत्पादन दर हा स्पर्धक साखर कारखान्यांच्या तुलनेत कमी करण्यात यश मिळविले आहे. उलट ज्यांचा खर्च जास्त आहे.असे विरोधक केवळ राजकीय हेतूने या कारभाराविषयी जरी अपप्रचार करत असले तरी सभासद त्यांच्या या चुकीच्या तंत्राला प्रतिसाद देणार नाहीत. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, या निवडणुकीत त्यांच्या बंधूसह सर्व आघाडीचा धुव्वा उडणार असल्याचा त्यांना अंदाज आल्याने त्यांचे बंधू जाहीर प्रचार सभांमध्ये उमेदवारांची ओळख करून देतानाही दिसत नाहीत. ते केवळ आपल्यापुरते एक मत मागण्यासाठी गाड्या पळवत आहेत.
सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आ. के. पी. पाटील, अंबरिश घाटगे, प्रकाश पाटील, संभाजी भोसले आदींची भाषणे झाली. प्रवीणसिंह पाटील, विकास पाटील, प्रवीण भोसले,देवानंद पाटील, रणजित सूर्यवंशी, सुनील चौगले ,नामदेव भांदिगरे, अमर देवळे, रणजित मगदूम, जगन्नाथ पुजारी, सम्राट मसवेकर, संजय मोरबाळे, अमोल मंडलिक, एम. बी. मेंडके, बाजीराव दबडे, शिवाजीराव सातवेकर,दिग्विजय पाटील,राहुल वंडकर,राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. दिग्विजय परीट यांनी आभार मानले.