ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : अर्जुनवाडी येथे गंगापूजन कार्यक्रम

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
अर्जुनवाडी ता.गडहिंग्लज येथे गंगापूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला दरवर्षी पंढरपूरला येथील वारकरी कार्तिकी वारीला जाऊन श्री पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेऊन आलेनंतर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गंगापूजन म्हामद्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करतात यावेळी भजनी मंडळा ने पंचपदी ,हरिपाठ, आरती केलेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी वारकरी, भाविक,ग्रामस्थ उपस्थित होते.