ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची विमानातून सहल सुरूते गावचा अभिनव उपक्रम

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खाजगी किंवा परिवहन महामंडळाच्या बस मधून जाते पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुला मुलींची सहल विमानातून गोवा ते हैदराबादला नेण्यात आली.
प्रथमच विमानाची सफर करणार असल्याने उस्ताह व कुतुहल मुलांमध्ये होता. त्यामुळेच विमान प्रवासाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती लहान मुलांना विमानाची प्रवास अनुभवता यावा या उद्देशाने ही सहल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भरमु आपटेकर यांच्या संकल्पनातून ही सफारी घडवण्यात आली. या सहलीसाठी ग्रामपंचायत सुरूते, प्रशालातील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.