ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार ! मंदिर समितीची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. दरम्यान आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपारीक पूजा, विधी सुरू झाल्या आहेत. प्रत्येक भाविकाला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे विनाविलंब दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने आजपासून (20 जून) देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले करण्यात येणार आहे.

आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रखुमाई यांचा पलंग काढण्यात येणार असून आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत. म्हणजेच देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीच्या या कालावधीत राज्यातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. त्यांचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

 विठ्ठल रखुमाईचे मंदिर 24 तास खुले ठेवण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून आहे. यावर्षी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 20 ते 7 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशी असणार नित्यपूजा :

सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच साठी दर्शन बंद राहणार आहेत. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks