कोल्हापूर : राधानगरी रोडवर गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात ; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप आहेत, तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्याभरातील कोल्हापुरातील बस अपघाताची ही दुसरी घटना आहे. मृत तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
कोल्हापुरात खासगी आराम बस (coach bus) उलटून अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडी येथे ही घटना घडली. यावेळी बसमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या बसमधील अंदाजे 25 प्रवासी यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल कोल्हापूर महानगरपालिका यांनी केले. या अपघातात 4 प्रवासी बसच्या खाली अडकले. त्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. या अपघातात तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहेत. या अपघातात चार प्रवासी बसखाली अडकल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित १६ प्रवासी हे सुखरूप आहेत.
कोल्हापुरातील पुईखडी येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. नीलू गौतम(४३), रिधिमा गौतम (१७), सार्थक गौतम (१३) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी पुण्यातील रहिवाशी आहे. या अपघतातील मृत्यूने गौतम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.