ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे आयुष्यमान भव अंतर्गत महाआरोग्य मेळावा संपन्न

नेसरी प्रतिनिधी : अंकिता धनके
नेसरी ग्रामीण रुग्णालय नेसरी यांच्यावतीने शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी दहा वाजता आयुष्यमान भवअंतर्गत आरोग्य महामेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यामध्ये सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व बारदेशकर हॉस्पिटल गडहिंग्लज व ग्रामीण रुग्णालय नेसरी येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या आरोग्य मेळाव्यामध्ये आजी-माजी सैनिकासह एकूण 181 रुग्णांनी आपला सहभाग नोंदवून उपचार घेतले व नऊ रुग्णांना पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. या महामेळाव्यामध्ये आबा आयडी व आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले.या आरोग्य महामेळाव्यामध्ये सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर बार्देस्कर हॉस्पिटल गडहिंग्लज व नेस्त्री ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.