बानगेत आनंदराव पाटील दूध संस्थेचे उद्घाटन ; पहिल्याच दिवशी म्हैस दूध ३११, गाय दूध २९२ लिटर झाले संकलन

बानगे (ता. कागल) येथे ‘गोकुळ’च्या नव्याने सुरू केलेल्या कै. आनंदराव शंकर पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पै. अमर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एकाच वेळी म्हैस दूध ३११ लिटर व गाय दूध २९२ लिटर असे ६०३ लिटर इतके दूध संकलन करण्यात आले.
दूध संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पै.अमर पाटील यांचे भाषण झाले. संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी आर. आर. सावंत, विलास पाटील, शंकर इंगवले, आनंदा डावरे, सागर पाटील, शहाजी पाटील, रामदास पाटील, तुकाराम सावंत, सुरेश लंबे, बाबुराव हिरुगडे,सुनील कदम, शिवाजी सुतार, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, कुंडलिक जमनिक, ग्रा. पं. सदस्या शीतल पाटील, सविता पाटील, सुलभा पाटील उपस्थित होते.
स्वागत आर. आर. पाटील यांनी केले. आभार संस्थेचे सचिव लक्ष्मण कोंडेकर यांनी मानले.