राज्यसरकारच्या अर्थसंकल्पातील शेती क्षेत्रासाठीच्या महत्वाच्या तरतूदी
निकाल न्यूज वेब टीम:
महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं सभागृहात सांगत शेतीक्षेत्रासाठी विविध योजनांविषयी माहिती दिली.
शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने कर्ज
3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्यात येईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बाजार समित्यांच्या बळकटीकरणा साठी 2 हजार कोटी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित करण्यात आली.
कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी
शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल स्वरुपात देण्यात येईल, असं अजित पवारांनी घोषित केलं. थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी देण्यात येईल. 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ करण्यात आल