कळे, काटेभोगाव येथे ऊसदरासाठी शेतकरी संघटनांकडून कारखानदारांच्या विरोधात चक्का जाम आंदोलन.

कळे-वार्ताहर अनिल सुतार
सध्या सर्वत्र शेतकरी संघटनांकडून मागील वर्षीचे चारशे रुपये व यावर्षीच्या ऊस दरासाठी तीव्र आंदोलन होत असताना पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव व कळे येथे शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या साखर गाळप दरातील उर्वरित चारशे रुपये व चालू वर्षी तीन हजार पाचशे रुपये दर मिळावा यासाठी सध्या सर्वत्र शेतकऱ्यांकडून होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पश्चिम भागातील दालमिया शुगर , कुंभी कासारी कारखाना, डी.वाय पाटील साखर ,अथनी शुगर या कारखान्यांच्या विरोधात शरद जोशी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमकपणे भुमिका घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत काटेभोगाव व पश्चिम पन्हाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ कळे येथील कोल्हापूर गगनबावडा मुख्य रस्त्यावर कारखानदार व सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य भाव मिळावा यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
चक्का जाम केल्याने कोल्हापूर गगनबावडा रोडवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी शरद जोशी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक जाधव,
व स्वाभिमानी शेतकरी संघटना कुंभी परिसर अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या या चक्का जाम आंदोलनावेळी कळे पोलीस ठाण्यातील पी.एस आय सतीश मयेकर, पो.हे.कॉ शंकर पाटील यासह पोलीस कर्मचाऱ्यांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना काटेभोगाव शाखा अध्यक्ष धोंडीराम चौगले ,सदस्य बबन खाटांगळेकर, सरदार पाटील,शिवाजी खाडे, सरदार आंग्रे ,शंकर गणू कांबळे ,विठ्ठल पवार वारनुळ, दीपक पवार ,विजय मगदूम कृष्णात मगदूम ,बंडोपंत पाटील, भगवान दिनकर लग पानारवाडी,सरदार पाटील वारनूळ,डाॅ.बी.एम पाटील,राजाराम बंडु वाळवेकर ,मा.उपसरपंच वाळवेकरवाडी, नंदु खाटांगळेकर, शंकर झेंडे,अर्जुन चौगले, कुमार पाटील वारनुळ,आनंदा मगदूम,गौतम कुंभार यासह परिसरातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.