जोतिर्लिंग फौंडेशनकडून शैक्षणिक पालकत्व प्रोत्साहन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन.

कौलव :
जोतिर्लिंग फौंडेशन आवळी बुद्रुक ता राधानगरी यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक पालकत्व उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जोतिर्लिंग फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदिप टिपूगडे यांनी केले आहे.
जोतिर्लिंग फौंडेशन समाजसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्याचा लाभ गोरगरीब,होतकरू,हुशार,व सर्व सामान्य लोकांना होत असतो. संस्थेच्या वतीने नुकताच शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमात जमा होणाऱ्या आर्थिक मदतीतून दुर्गम, पूरग्रस्त भागातील शाळा अगर शालेय विदयार्थ्यांना शालेय साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे.तर मदत करणाऱ्यांना संस्थेच्या सन्मान पत्राद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी व्हावे.आपल्या मदतीमुळे शैक्षणिक विद्यार्थ्यांना हातभार लागेल.या साठी 7720923131 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.