ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे आयुष्यमान भव अंतर्गत महाआरोग्य महामेळावा

नेसरी प्रतिनिधी :
ग्रामीण रुग्णालय नेसरी यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी दहा वाजता आयुष्यमान भव अंतर्गत आरोग्य महामेळावा आयोजित केला आहे या महामेळाव्यात सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व बारदेस्कर हॉस्पिटल गडहिंग्लज येथील हृदयविकार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ उपस्थित राहणार आहे.
या योजनेअंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड रोग, हृदयरोग या आजारावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी केली जाईल.
तसेच ABHA ID व आयुष्यमान कार्ड काढले जातील तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा व आपले आरोग्य सदृढ ठेवावे असे आव्हान डॉ. सी. जे. खोत वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 ग्रामीण रुग्णालय नेसरी यांनी केले आहे.