ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही , छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर जहरी टीका

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडत आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर संकटामागून संकटे आली नसती.

गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांनी आवर्जुन काढली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षाबद्दल ऊहापोह घेतला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भुजबळ म्हणाले, ‘शरद पवारांना ओबीसींना आरक्षण दिलं. आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे-पाटलांवर निशाणा साधला. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? की तुझं खातोय का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही. असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात. का आमची लेकंर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली.

अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात?ते म्हणाले, ओबासी आरक्षाणाचा आदेश केंद्राने दिला, शरद पवार यांनी तो मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. गावागावातले गावबंदीचे फलक पोलिसांनी हटवावे. आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर दिलाय?जशास तसं उत्तर द्यावं लागेल. हम आह भरते है तो बदनाम हो जाते है… अशी शायरी करत त्यांनी जातनिहाय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे, अशी मागणी केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks