ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची गुरुवारी हुतात्मा तुकाराम चौक येथे सभा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील साखर कारखाने वेगाने सुरू असताना आता ऊस दराबाबत आंदोलन उभा केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांची मुरगुड (ता. कागल) येथे गुरुवार दि. १६ रोजी हुतात्मा तुकाराम चौक येथे सायंकाळी ५ वाजता होणार सभा होणार आहे.
त्यामुळे भविष्यात कागलमध्ये आंदोलन बळावणार आहे. शिवाय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या – होमपीचवर येऊन राजू शेट्टी त्यांना उत्तर देणार असल्याने या सभेकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित ठेवण्याचे नियोजन कार्यकर्ते करत आहेत.