ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड मध्ये शेतकरी प्रबोधन रॅली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
यावर्षीच्या उसाला प्रति टन ३५०० रुपये आणि मागील वर्षीच्या ४०० रु दिल्याशिवाय ऊस तोड घेऊ नका असे आवाहन करत मुरगूड शहरातून युवकांसह शेतकरी नागरिक यांनी प्रबोधन रॅली काढली.
मुरगूड शहरात यंदा स्वाभिमानी शेतकरीसंघटनेला मोठा पाठींबा मिळत आहे. रॅलीत राणोजी गोधडे, बबन बाबर, विजय आडवं दत्तात्रय साळोखे, मारूती चौगले, सुरेश साळोखे, गजानन मोरबाळे, प्रशांत मोरबाळे, राजू भोसले, उदय भोसले, समाधान हेंदळकर, संदीप भारमल आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.