ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोळावीवाडी येथे विद्यार्थ्यांनी कागदी आकाशकंदील बनवून प्लॅस्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचा केला संकल्प

कागल तालुक्यातील विद्या मंदीर बोळावीवाडी शाळेत  विद्यार्थ्यांनी कागदी आकाशकंदील बनवून प्लॅस्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

दिवाळी सुट्टी सुरु असतानाही विद्या मंदीर बोळावीवाडी शाळा नियमित सुरू राहीली. या दिवशी कागदाचे आकाशकंदील सर्व विद्यार्थ्यांनी बनवले. प्लॅस्टिक आकाशकंदील न वापरता स्वतः बनवलेला कागदी आकाशकंदील घरी वापरण्याचा संकल्प केला. तसेच फटाकेमुक्त दिवाळी करून साठलेल्या पैशातून पुस्तक खरेदी करण्याचा संकल्प केला.

दुर्गम भागातील एक शिक्षकी शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक उपक्रम साजरा केला. यावेळी मार्गदर्शक म्हणून शिक्षक  संदीप पाटील , स्नेहल ढोकरे यांनी काम पाहिले. शाळा समिती अध्यक्ष  विठ्ठल मोरे उपस्थित होते. प्रेरणा व मार्गदर्शन कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर यांचे मिळाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks