50 हजाराची लाच घेताना PWD मधील शाखा अभियंत्याला अॅन्टी करप्शनकडून अटक

50 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा लक्ष्मण ढोले (54, पद – शाखा अभियंता, कार्यालय – सार्वजनिक बांधकाम ग्रामीण नागपूर. रा. त्रिमुर्ती नगर, नागपूर) असे लाख घेणार्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, ग्रामीण नागपूर यांचे कार्यालयाकडून के.मा. निधी अंतर्गत नरसाळा , गारगोटी दिघोरी (नाका) – (संजूबा हायस्कुल ते दिघोरी नाका) प्रजिमा- 135 वर सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून, मुख्य रस्त्यापासून ते नाल्या पर्यंत सिमेंट नालीचे काम सुरु आहे. यातील तक्रारदार यांचे घरासमोरील सुरु असलेल्या सिमेंट नालीचे बांधकाम तक्रारदार यांचे घराचे कंपाउंडचे आतून न करता बाहेरून करण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष रुपये 50,000 ची लाचेची मागणी करून आलोसे यांचे कार्यालयाचे परिसरात पंचांसमक्ष स्वीकारली.
नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलिस उप अधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक योगिता चाफले , पोलिस निरीक्षक आशिष चौधरी ,पोलिस निरीक्षक वर्षा मते, पोलिस हवालदार अनिल बहिरे, अमोल मेंघर,अस्मिता मल्लेरवार, चालक हर्षलता भरडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे