ताज्या बातम्या

बहिरेश्वरच्या श्रीकृष्ण सार्वजनिक तलाव परिसराचा विकास शासकिय निधी अभावी रखडला : ग्रामस्थांच्या मध्ये नाराजी 

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर काशी क्षेत्रात पुण्यभुमी म्हणून ख्याती असलेल्या आणि बाराव्या शतकाची साक्ष देणाऱ्या करवीर तालुक्यातील  बहिरेश्वर गावच्या  प्राचीन ऐतिहासीक श्रीकृष्ण सार्वजनिक तलावाच्या परिसराचा सर्वांगिण विकास शासकीय निधी अभावी रखडला गेला .विकास कामेच ठप्प झाल्याने ग्रामस्थ वर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली

                   

कोल्हापूर शहराच्या पश्चिम भागात अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर भोगावती, कुंभी नद्यांच्या पवित्र संगमावर बहिरेश्वर गाव वसलेले आहे . गावच्या पश्चिम बाजूस तीर्थक्षेत्राचा दर्जा लाभलेला श्रीकृष्ण सार्वजनिक तलाव आहे . शासकीय निधीचा पाठपुरावा होत नसल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत . 

                   

या  तलावाच्या सभोवती दगडी कुंपण नाही . वीस वर्षा पासून साचलेला गाळ काढलेला नाही . घाटाची उभारणी सुद्धा झालेली नाही . तलावामध्ये केंदाळाचे साम्राज्य  वाढलेले आहे .मिनी रंकाळा बनविण्याचे स्वप्न भंगलेले आहे .  सार्वजनिक तलावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्रीकृष्ण मंदीराचा जीर्णोद्वार झाला नाही . लोकप्रतिनीधीनी शासकीय निधी मंजूर करून विकास कामाची पूर्तता पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks