मुरगूडमधील दूषित पाण्याची समस्या सोडवा ; नागरिकांचे पालिकेला निवेदन

शहरात काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर योग्य ती कार्यवाही होऊन स्वच्छ व चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे यांना दिले.
त्यामुळे तातडीने योग्य त्या उपाययोजना करून स्वच्छ पाणी पुरवावे. असे लेखी निवेदन नागरिकांनी मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे दिले. यावेळी मुख्याधिकारी घार्गे यांनी पाणीपुरवठा विभागाला योग्य सूचना देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देऊ, असे संबंधितांना आश्वासन दिले. यावेळी संतोष भोसले, सुहास खराडे, मयूर सावर्डेकर, पांडुरंग मगदूम, सर्जेराव भाट, अमर सनगर, ओंकार पोतदार, सचिन मांगले, रणजित मोरबाळे, रोहित मोरबाळे, चेतन गोडबोले, पृथ्वी चव्हाण, प्रवीण नेसरीकर, सोमनाथ यरनाळकर, प्रल्हाद भोपळे ,विक्रम घोरपडे आदी उपस्थित होते.