ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : शहरवासीयांना दिलासा आज गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार : जल अभियंता नेत्रदीप सरनोबत

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गेल्या आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे बालिंगा उपसा केंद्र नादुरुस्त झाल्यामुळं पूर्ण शहरात पाणी बाणी झाली होती.
दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जोखमीचं हे काम आज पूर्ण केलं. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळं शहरवासीयांना दिलासा मिळाला.
दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून पाणी जलशुद्धीकरणासाठी टाक्यांमध्ये सोडण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. या टाक्या भरायला सुमारे आठ तासांचा कालावधी लागणार असल्यानं आज गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी
दिली आहे.