उलवेत सिडकोची ठेकेदाराला साथ ; मात्र जनतेला डेंगू आणि मलेरियाची साथ

नवी मुंबई :
उलवे नोड येथील सेक्टर ८ मधील सिडको मार्फत सुरु असलेला SEVAGE TREATMENT PLANT कडे दुर्लक्षित कारणामुळे शहरात तेथील होणार्या दुर्गंधी मुळे आणि या प्रकल्प येथील अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी मुळे होणार्या मच्छरांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि संपूर्ण शहरात दुर्गंधी, रोगराई पसरत आहे.
यामुळे अनेक नागरिक दगावण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी कोण घेणार? तरी प्रशासन यांनी अत्यंत गांभीर्याने ही बाब लक्षात घ्यावी, आणि तातडीने या ठिकाणी काम करत असणार्या कामगारांच्या आणि स्वच्छतेच्या बाबत जे काही समस्या आहेत. त्यावर तातडीने उपाय योजना कराव्यात, या प्रामुख्याने मागणीसाठी सिडकोला आणि ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी मी चालोय, येताय ना. या TAG लाईनवर स्थानिक नागरिकांनी आज सकाळी ११ वाजता सिडको वर धडक मोर्चा आयोजित केला होता,
गेली कित्येक महिने यासाठी सिडकोकडे पत्र व्यवहार केला असता कोणतीच कारवाई होत नसल्याने हा मोर्चा आयोजित केला होता पण सिडको अधिकारी यांना ही खबर लागताच त्यांनी या ठिकाणी धावती भेट दिली, येथील नागरिकांची प्रामुख्याने समस्या संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे.
या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पत्रकार बंधू आणि स्थानिक नागरिक यांनी चांगलाच जाब विचारला, व यामुळे ठेकेदाराचे ही धाबे दणाणले आहे, या ठिकाणी स्थानिक नागरिक जमाव गोळा झाले होते, या ठिकाणी अनेक संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक एकत्रित आले होते, यामध्ये प्रामुख्याने NMGKS चे प्रमुख वैभव पाटील, शिवसेना शहर प्रमुख गौरव म्हात्रे, प्रणय कडू-युनियन लीडरचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार ठाकूर व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
या सिडकोच्या अधिकारी यांच्या भेटी नंतर पुढील कारवाई काय होते, तसेच स्थानिक नागरिकांना, तेथील कामगारांना नाहक त्रास होता काम नये, असे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव म्हात्रे सज्जड शब्दात प्रतिक्रिया नोंदवली, तसेच या प्रकल्पावर आमचे बारकाईने लक्ष्य असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले, याच्या नंतर पुढील मोर्चेची दिशा लवकरच ठरवणार असल्याचे त्त्यांनी सर्वच पदाधिकारी यांनी सांगितले.