कागलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची लोकसभा आढावा बैठक

कोल्हापूर ग्रामीण विभागाची तालुका निहाय बैठक आज दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी कागल शासकीय विश्रामगृह,कागल येथे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले, नरेंद्र तांबोळी – चंदगड विधानसभा उपसंघटक,प्रशांत मते – कागल विधानसभा उपसंघटक,नरेंद्र जायले -राधानगरी विधानसभा उपसंघटक,योगेश खडके उपसंघटक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवणे अश्या विषयावर पक्ष निरीक्षक आणि पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी वरिष्ठ पातळी वरून दूर करण्यावर भर दिला जाईल. येणारी लोकसभा आणि पुढील येत्या सर्वच निवडणूका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढवेल असा सर्वांनी निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ,जिल्हा सचिव वैभव माळवे, विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे ,तालुका अध्यक्ष कागल (पूर्व) विनायक आवळे , तालुका अध्यक्ष कागल (पश्चिम) सौरभ पोवार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभुते,तालुकाउपाध्यक्ष निखिल परीट,विवेक गिरीबुआ,प्रदीप कोळी, विभाग अध्यक्ष गणेश सुतार,सुशांत मोरे, कमलेश रंगापुरे,अजित मोडेकर, दिपक घाटगे,विनय पाटील,शुभम कुंभार,सुहास जाधव, अक्षय पडवळे, सग्राम आवळे,बिरदेव भोपळे,अवधूत कालेकर , प्रभाकर थोरात, संदीप आवळे , अमोल आवळे, अमित गायकवाड, शरद रेडेकर, अनिल पुजारी, अमर आवळे,आदी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.