ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राज्यस्तरीय शालेय कुस्तीत समृद्धी किणीकरला ब्राँझ पदक.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बारामती येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मुरगूड येथील साई संकुल ची मल्ल व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी समृद्धी उमाना किणीकर हिला ७६ किलो वजनी गटात ब्राँझ पदक मिळाले.तिने अमरावती,नाशिक व लातूरच्या मल्लांना मात दिली व हे पदक मिळविले.आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लगाटे यांनी तिला मार्गदर्शन केले.
तिच्या या भरघोस यशाचे कौतुक करून न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मार्फत तिचा सत्कार करण्यात आला.मुंबई शहरात वास्तव्य असलेल्या या मुलीला आईवडिलांनी खास कुस्ती साठी मुरगूड च्या प्रशिक्षण केंद्रात दाखल केले असून कुस्ती मधील प्रावीण्य पाहून ते आनंदित झाले.