विधायक उपक्रम व संस्कृतीतून तरुणांचे शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे ; कागलच्या शाहू लोकरंग महोत्सवात ११४ मंडळांचा मोरया पुरस्काराने सन्मान

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे कार्य गणेशोत्सव काळात तरुण मंडळांनी विधायक उपक्रम राबवून केले.या तरुणांनी संस्कृतीचे जतन करीत छत्रपती शाहू महाराज यांचा जनसेवेचा वारसा जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले.असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
येथील जयसिंगराव घाटगे संकुल येथे राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू लोकरंग महोत्सववेळी राजे फौंडेशनमार्फत घेतलेल्या मोरया पुरस्कार व टॕलेंट हंटमधील विजेत्यांना बक्षिस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कागल,मुरगुड, कापशी, गडहिंग्लज,उत्तूरसह जिल्ह्यातील११४ गणेश मंडळे,महिला बचत गट व सेवाभावी संस्थांचा उल्लेखनीय कार्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे व राजे विरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते गौरव केला.
यावेळी भरतनाट्यम व धनगरी ढोलाचे सादरीकरण झाले.
ते पूढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी मातीत लपलेल्या हि-यांना शोधून त्यांच्यावर पैलू पाडले. त्यामुळे अनेक कलाकार घडले. त्यांचाच आदर्श स्व. विक्रमसिंहराजे यांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक कलाकार-खेळाडू यांना प्रोत्साहन दिले. शाहू लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून टॅलेंट हंट व मोरया पुरस्कारातून त्यांचेच अनुकरण आम्ही करीत आहोत.यातून अनेक खेळाडू व कलाकार भविष्यात चमकतील.
यावेळी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे,श्रेयादेवी घाटगे,आनंदराव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
ता.5 रोजी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लोकराजा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .परीक्षक म्हणून मिलिंद देसाई,अमोल राबाडे, वर्षा अष्टेकर ,मारुती मदारे,काकासाहेब चौगुले यांनी काम पाहिले.
विवेक गवळी यांनी बहारदार निवेदन केले.
तब्बल सात तास चालल्या टॅलेंट हंट स्पर्धा
तब्बल सात तास चाललेल्या टॅलेंट हंट स्पर्धेस प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
त्यामधील विजेत्यांची नावे अशी…..
खुला गट जिजामाता शिवकालीन शस्त्रकला गट,( गडहिंग्लज )शांतीदूत मर्दानी आखाडा, (कागल), स्वरांजली वाघुडेकर, प्रवीण मोरे, (दोघेही कागल), कृष्णात घुले (कसबा सांगाव), सानिका सावरे (गडहिंग्लज ), अथर्व जोशी (कागल).
शालेय गट -श्रावणी पाटील (कागल), बोरवडे विद्यालय(बोरवडे), तनुष यादव (कागल), सुवर्णजीत मस्के (गडहिंग्लज) ज्ञानप्रबोधनी (बाचणी ),चेतन सुतार (गोरंबे), चिन्मयी कुंभार (अर्जुनवाडा)