ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड ग्रामीण रुग्णालयास तज्ञ डॉक्टरांची गरज ,प्रसुती व छोटया शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची अन्य रुग्णालयाकडे धाव ?

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ग्रामीण रुग्णालयात तज्ञ व कायमस्वरुपी डॉक्टर एक वर्षापासून नसल्याने स्त्री रुग्णांना प्रसुतीसाठी व छोट्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना अन्य रुणालयाकडे धाव घ्यावी लागत आहे . वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्याचा खेळखंडोबा सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .

या ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकिय अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त आहेत ती एक वर्षापासून भरलेली नाहीत . कंत्राटी दोन डॉक्टरावर रुग्ण सेवा सुरु आहे . वैद्यकिय अधिक्षक प्रशासकिय कामात व्यस्त असल्यामूळे त्यांना या रुग्णालयाकडे लक्ष दयायला वेळच नाही . कंत्राटी डॉक्टरांवर सलग २४ तास सेवा देण्यावर रामभरोसे पध्दतीने या ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा सुरु आहे .

महत्वाचा मुद्दा म्हणजे या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ ,भूलतज्ञ ‘ अस्थिरोगतज्ञ ‘सर्जन व फिजोथेरपी तज्ञ नसल्याने कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे अशक्य होते . त्यामूळे शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना राधानगर किंवा गारगोटी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते . त्यामूळे हे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे .सामान्य रुग्णांची अक्षरशः फरफट होत आहे . तज्ञ डॉक्टर विना शस्त्रक्रियेविना तसेच औषधांविना हे ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी ठरत आहे . वैद्यकिय शिक्षणमंत्र्याच्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे .

या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरची नियुक्ती तातडीने व्हावी तसेच शस्त्रक्रिया खर्चासाठी शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेत या ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करावा अन्यथा दवाखाना कुलूपबंद आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे .

शासनाकडून कार्यवाही नाही !

या ग्रामीण रुग्णालयास तज्ञ डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया करणे अशक्य होत आहे . त्यामूळे रुग्ण इतरत्र जातात ही वस्तुस्थिती आहे . यासंबधी डॉक्टर व सोयी पुरवणे हे शासनाचे काम आहे . कधी कार्यवाही होते याची आता वाटच पहावी लागणार .
डॉ . भगवान डवरी
( वैद्यकिय अधिक्षक , मुरगूड ग्रामीण रुग्णालय )

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks