धामणी खोऱ्यातील बळपवाडी येथे आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या हस्ते ” या ” सहकारी पतसंस्थेचे धुमधडाक्यात उदघाटन.

कळे -वार्ताहर अनिल सुतार
चांगल्याचा पुरस्कार करणारी व्यवस्था समाजात आणणे गरजेचे आहे समाजाच्या उन्नतीसाठी सतत झगडले पाहिजे.धामणीखोऱ्यात सहकार क्षेत्रात चांगली प्रगती होत असून पतसंस्था या येथील सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरतील असे मत पन्हाळा शाहूवाडी चे आमदार डॉ विनय कोरे सावकार यांनी व्यक्त केले .ते पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी येथील विलास पाटील साहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी धामणीखोऱ्याशी माझी गेली अठ्ठावीस वर्षे नाळ जोडली असून येथील विविध विकासकामांच्या सुखाचा मी अनुभव घेत आहे असे ते म्हणाले.त्यानंतर त्यांनी धामणी प्रकल्पाच्या आठवणी सांगत यावर्षी एक टीएमसी पाणी धरणात अडवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर त्यांनी धामणी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचे कौतुक केले.
धामणीखोऱ्यात अतिशय दमदारपणे सुरुवात करणाऱ्या विलास पाटील साहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बळपवाडी या संस्थेचे उद्घाटन रविवार दि २९ रोजी आमदार डॉ विनय कोरे सावकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर दिपप्रज्वलन होऊन परिसरातील विविध गुणवंतांचा आणि परिसरातील सहकार क्षेत्रात काम करून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध दुध संस्था व सेवा सोसायटी चेअरमन, पदाधिकारी यांचा पतसंस्थेच्या वतीने आमदार डॉ विनय कोरे सावकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजीबाबा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच हरपवडे येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौगले यांनी आपले मत मांडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे, पतसंस्था चेअरमन व पणोरे ग्रामपंचायत सदस्य भाऊसो कृष्णात बळीप ,पन्हाळा भाजप तालुका अध्यक्ष मंदार परितकर ,आनंदा चौगले हरपवडे, सरदार पाटील पणुत्रे,आनंदा भाऊ बळीप, सर्जेराव पाटील गवशीकर तर प्रमुख उपस्थिती मध्ये युवराज बेलेकर कळे,संजय पाटील कळे, सरपंच मारुती आवजी पाटील, प्रदिप राजाराम बळीप, राजाराम बळीप,आनंदा रामा बळीप, पतसंस्था मॅनेजर धीरज पाटील यासह परिसरातील सर्व सावकर प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक विनोद बळीप यांनी तर सुत्रसंचालन विलास पाटील आंबर्डे यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन त्रिमुर्ती तरुण मंडळ ,दत्त तरुण मंडळ, गावातील सर्व सेवा संस्था दूध संस्था व ग्रामस्थ पणोरे व विलास पाटील साहेब फाऊंडेशन अणदूर यांनी केले होते.