ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असून समाजाच्या भावना लक्षात घेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाना देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठींबा आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भावना समजून घेवून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks