पाटगाव : मध उत्पादनासाठी जिल्हा नियोजन मंडळ व प्रशासनाला हिमालयासारखे पाठबळ देवू : ना.हसन मुश्रीफ

पाटगांव प्रतिनिधी
मध उत्पादनासाठी जिल्हा नियोजन मंडळ व प्रशासनाला हिमालयासारखे पाठबळ देवू असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.ते आज पाटगांव (ता . भुदरगड )येथे जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मधाचे गांव पाटगांव चा लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
केंद्रीय पंर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ठ पर्यटन ग्राम स्पर्धेत कास्य पदक विजेते पाटगांव हे गांव महाराष्ट्रातील एकमेव विजेते गाव ठरल्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके संयोजन करण्यात आले होते.पाटगांव सह अंतूर्ली, तांब्याचीवाडी, मठगांव व शिवडाव या चारही गावातील मध उत्पादक, ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सर्व पदाधिकारी ,मधपाळ मोठ्या संख्येने या लोकार्पण मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पुढे बोलताना ना हसन मुश्रीफ म्हणाले की, या पाचही गावातील निसर्गऋतूचक्र सुरळीत आहे. मधमाशा हे ऋतुचक्र संतूलन ठेवण्याचे काम करतात. मधाचा हा व्यवसाय सेंद्रीय पध्दतीने कसा करता येईल व मधाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून मधाला चांगला भाव कसा मिळेल याकडे प्राधान्याने लक्ष देवू.मधाच्या या माध्यमातून शाश्वत विकास घडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
रांगणा किल्ला व पर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार आहोत.असे सांगून या परिसराचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे ना हसन मुश्रीफ शेवटी म्हणाले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले की, मधाचे उत्पादन करणाऱ्या या गावांना जपायला हवे.पाटगांव ची ही संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी आपण उभे राहिलो आहोत.येणाऱ्या काळात मधाचे उत्पादन वैज्ञानिक पध्दतीने कसे करता येईल व पर्यटनालाही कशी चालना मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच ५० टक्के सवलतीत सर्व मधपाळांना १५०० मधपेट्यांचे वाटप करत आहोत. निसर्गाशी एकरूप होवून कसे सुंदर जीवन जगता येईल यासाठी आंम्ही हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा केला आहे.येणाऱ्या काळात शासकिय जमिनीवर मध उत्पादनासाठी अनुकूल असणारी झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.या परिसरातील पर्यटन वाढवून खाद्य संस्कृतीलाही प्रेरणा देवूया आणि पाटगांव गाव हे पर्यटन ग्राम म्हणून चांगले यशस्वी करूया.
यावेळी या विभागाचे खा.संजय मंडलिक यांनी या मधपाळांना व या संबंधाने काम करणाऱ्या प्रशासनाला पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.ग्रामीण उद्योगाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे राज्याध्यक्ष रविंद्र साठे यांनी या प्रकल्पास सरकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त केले व सेंद्रिय मधाला चांगला भाव मिळवून दिल्याचे सांगितले. यावेळी बोलताना नाबार्ड चे उपव्यवस्थापक अनिलकुमार रावत म्हणाले की, या प्रकल्पात जिल्हा प्रशासनाचे मोठे योगदान आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन कसे आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल याकडे लक्ष देत असल्याचे ते म्हणाले नाबार्ड चे हे पाठबळ आणखी ६ वर्षापर्यंत देवू.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ना हसन मुश्रीफ व इतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा पाटगांव ग्रामपंचायत, अंतुर्ली, शिवडाव तांब्याचीवाडी, मठगांव ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.मध पेट्यांचे प्रातेनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. नामफलकाचे अनावरण करण्यातकुरुंदवाडे,यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती अंशू सिन्हा, महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो संदेश जोशी, जिल्हा खादी व ग्रामद्योग अधिकारी श्री दत्तात्रय कुरुंदवाडे, भुदरगड, आजराच्या प्रांत,तहसिलदार अश्वीनी वरूटे, बिद्री संचालक धनाजीराव देसाई, बाबा नांदेकर, मधपाळ संस्थेचे अध्यक्ष वसंत वास्कर व त्यांचे पदाधिकारी, पाटगांव चे सरपंच विलासराव देसाई, अंतु्र्लीचे सरपंच रामदास देसाई, मठगांवच्या सरपंच निशा संकपाळ शिवडावच्या सरपंच प्रणाली प्रकाश तवटे, पंचक्रोशीतील मधपाळ, ग्रामस्थ महिला,मांन्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होते.