गोरंबे : इंडियन नेव्हीत निवडीबद्दल प्रांजल परीट चा सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आजच्या महिला या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत बौधिक क्षेत्रात सुद्धा महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने किंबहूना त्यांच्या पुढे सर्वच क्षेत्र काबीज केले आहे अशा वेळी ग्रामिण मुलींनी देखील ब्रुर्सटलेल्या मानसिकतेत न अडकता आता सर्वच क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन अन्नपुर्णा शुरचे चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले.
केनवडे अन्नपुर्णा शुगर येथे कु.प्रांजल विष्णू परीट हिची इंडियन नेव्ही (एस.एस.आर) मध्ये निवड झालेबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले, आतापर्यंत ग्रामिण पालक सुद्धा मुलींच्या बाबतीत थोडेशे मागेच होते.परंतू पालकांनी देखील मुलगा मुलगी भेद विसरून कर्तबगार पाल्याला प्रोत्सहान देण्यासाठी पुढे येताना दिसत आहे ही समाधानाची बाब आहे.
यावेळी कु.प्राजंल विष्णू परीट हिचा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी विष्णूपंत गायकवाड,शंकर सावंत,पंडित दंडवते,दगडू चौगले,दत्ता दंडवते,दत्ता पाटील,पिंटू दावणे, रणजित गायकवाड,आप्पासो पाटील,निशिकांत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिनंदनाचा वर्षाव…
प्रांजल परिट हिच्या घरी कपडे धुणे तसेच ईस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. घरी आईला तसेच वडिलांना कामात मदत करीत कढीण परिस्थीतीतून हे यश तीने संपादन केले आहे. गावातील तसेच पंचक्रोशीतील इंडियन नेव्हीमध्ये भरती झालेली ती एकमेव मुलगी असल्याने तिच्यावर सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.