ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राहुल कुरूणकर यांची अपघातग्रस्तांना योग्य वेळी मदत

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
बुधवार दि 29 नोव्हेंबर 2023 रोजी, शिप्पूर येथील 6 महिला व 3 पुरुष धामणे येथे गवत कापायला गेले होते. तेथून सायंकाळी घरी परतत असताना वाटेत जख्खेवाडी जवळील ओढ्याजवळ या सर्वांना घेऊन जाणारा टेम्पो ताबा सुटल्याने पलटी झाला.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी रुग्णवाहिकेला संपर्क केला पण काही कारणास्तव रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी मुमेवाडी येथील नागरिक रामदास साठे, वसंत काटे यांनी उत्तुर मधील राहुल कुरूणकर यांना संपर्क केला असता.
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या चारचाकी गाडी मधून जखमी महिलांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कृतीमुळे अपघातग्रस्तांना योग्य वेळी उपचार मिळाल्याने नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.