ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विद्या मंदिर नंद्याळ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न ; पालकांचा व ग्रामस्थांचा अधिक प्रतिसाद

नंद्याळ ता. कागल या प्राथमिक शाळेमध्ये आज 15 जून रोजी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत,पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचा फेटा बांधून गावातून प्रभात फेरी काढलेनंतर शाळेमध्ये त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाठ्यपुस्तक व गणवेश प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले व मनोगते संपन्न झाली. एकूणच प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम खूप भव्यतेने पार पडला.या कार्यक्रमांसाठी गावातील तरुण वर्ग,ग्रामस्थ,पालक,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती, या सर्वांचे खूप मोठे सहकार्य मिळाले.