नवरात्री उत्सवनिमित्त किल्ले दुर्गाडी येथे भाविकांची झुंबड !

किल्ले दुर्गाडी ( सचिन कांबळे ):
संपूर्ण देशात नवरात्री उत्सव अगदी भक्तिपूर्वक साजरा केला जातो, त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील बाझार पेठ मध्ये किल्ले दुर्गाडी देखील सालाबाद प्रमाणे यंदा ही नवरात्री उत्सव अगदी थाटामाटात साजरा सुरु आहे. काल दिनांक २४ रोजी यामधील शेवटचा दिवस होता. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी पाहण्यास मिळाली. सर्व लोक अगदी भक्ती भावाने सामील झाले होते. श्री माता दुर्गाची देखील पूजा अगदी छान बांधली होती. लोकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या, सार्वजनिक मंडळांकडून खूप छान सोय करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने श्री रवी पाटील आणि विश्वनाथ भोईर यांच्या किल्ले दुर्गाडी येथील नवरात्री उत्सव समिती मार्फत करण्यात आले होते.
या किल्ले दुर्गाडी येथील खास आकर्षण होते ते म्हणजे येथील सर्व तरुण तरुणींना तसेच अबाल वृद्धांना मनोरंजन करण्यासाठी खास मोठे मोठे पाळणे तसेच मौत का कुआ जैसे बलून शुटर असे अनेक खेळ ठेवण्यात आले होते. माता दुर्गाचे दर्शन घेतल्यानंतर येथील या सर्व मनोरंजन गोष्टींचा देखील आस्वाद घेण्यात यावा हाच हेतू असे समितीकडून बोले जात होते, तसेच या ठिकाणी मात्र याकरिता बाझार पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक विनोद काळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपवते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार, व महिला पोलिस पथक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थितीत होते.