ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरवडेच्या वारकर्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू , लोणंदमध्ये रुळ ओलांडताना घडली दुर्घटना

सरवडे  येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या पंढरपूर पायी दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. वारीत ट्रक चालकाचे काम करणार्‍या वारकर्‍याचा अपघातीमृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून सरवडे गावावर शोककळा पसरली आहे. 

 मयत व्हरकट हे अनेक वर्षे गावातून जाणार्‍या आषाढी दिंडीत सहभागी असायचे. यावर्षी देखील ते दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. आज लोणंद येथे पहाटे उठल्यानंतर प्रार्थविधीला जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून चालले होते. त्याचवेळी रेल्वे आल्याने ते रेल्वेला धडकले अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks