आजरा: भूमी अभिलेख विभागाचा अजब कारभार

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
सध्या शिवारामध्ये ऊस इ.खरीप पिके असताना भूमी अभिलेख विभागाकडून शेती क्षेत्र मोजण्याचे काम सुरू आहे.वर्षभरापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी साधी मोजणी,तातडीची मोजणी ,अति तातडीची मोजणी करिता नियमानुसार रक्कम संबंधीत खात्याकडे भरण्यात आले होते.संबंधित सर्वच शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र मोजून हद्द कायम करण्याचे काम सुरू आहे मात्र सध्या शेतात पिके असल्याने विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे मोजणी अधिकारी मोजणी करीत नसल्याचे निदर्शनास येते आहे तसेच पुन्हा अर्धी रक्कम भरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे यावर्षी पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे त्यात पुन्हा पैसे भरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना परवडणारा नाही तसेच शासनाने पहिल्या भरलेल्या रकमेत शिवारातील पिके निघाल्या नंतर शेती क्षेत्र मोजणी करण्याची मोजणी तालुका कार्यालयाने करावी अशी मागणी शेतकरी पांडुरंग शिवूडकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.