ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रियांका येरुडकर यांना सुवर्णपदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा २०२३-२४ या दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र वन विभागाच्या प्रियांका सुखदेव येरूडकर (वनरक्षक,सामाजिक वनीकरण गारगोटी) यांनी सुवर्ण पदक मिळवले.

अतिशय अटीतटीच्या सामन्यात दिल्ली आणि हरियाणा च्या स्पर्धकांचा पराभव करीत हे घवघवीत यश संपादन केले. प्रियांका येरुडकर यांनी ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पूर्वी 2020 मध्ये प्रियांका यांनी याच स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक तर 2022 मध्ये रौप्य पदक मिळवले होते.

या यशाबद्दल सचिवालय जिमखाना मुंबई चे मानद सचिव संजय फोपले, मंत्रालय सचिव संजय कदम, प्रशिक्षक पांडुरंग पाटील (डीवायसपी एक्साईज), उपवनसंरक्षक एस. डी.गवते(सामाजिक वनीकरण कोल्हापूर),वनक्षेत्रपाल एस. ए.केसरकर, वनपाल श्री ठोंबरे, वनपाल श्री चव्हान आदी स्टाफ सामाजिक वनीकरण गारगोटी यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks