” मराठा आरक्षण ” संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागताहार्य: राजे समरजितसिंह घाटगे राज्य सरकारनेही त्वरित रिव्ह्यू पीटिशन दाखल करून आरक्षण प्रश्नी तत्परता दाखवावी

कागल :
मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागताहार्य आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे व कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
ते पुढे म्हणाले ,102 व्या घटना दुरुस्ती बाबत सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या अर्थाला केंद्र सरकारने पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत असा चुकीचा अर्थ काढला जात आहे वस्तुतः हे अधिकार राज्यांनाच आहेत. ते केंद्राने स्वतःकडे कधीच घेतले नाहीत.आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकार आपल्या याच भूमिकेवर ठाम आहे. याच मुद्द्यांवर परवाच पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.तसेही सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीनी हे मान्यही केले आहे.त्यामुळे या पुनर्विचार याचिकेचा निर्णय लवकर लागला ,आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व अधिकार राज्यालाच आहेत हे स्पष्ट केले तरी याचा फायदा निश्चितच मराठा समाजाला होईल.
राज्य सरकारनेही वेळ न घालवता रिव्ह्यू रिट पिटीशन त्वरीत दाखल करावे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने रिव्ह्यू रिट पिटीशन दाखल करणेबाबत ताबडतोब पावले उचलायला हवी होती
मात्र या निकालाचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यामध्ये राज्य सरकार वेळ घालवत आहे.
मागासवर्ग सूची बनवण्याच्या राज्याच्या अधिकारावर गदा येत नसलेचे केंद्रानेही पुन्हा स्पष्ट केल्यामुळे राज्य सरकारच्या रिव्यू रिटपिटीशन ला बळ मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने ते त्वरित दाखल करावे.