तन्मय चव्हाण ची आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुरुंदवाड येथील तन्मय सुनिल चव्हाण याची भारत सरकारच्या वतीने काष्ट प्रकल्पातर्गंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी जगातील टॉप कृषी विद्यापीठापैकी एक असलेल्या बँकॉक येथील एशियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे निवड झाली आहे .
४५ दिवसाच्या या प्रशिक्षण काळामध्ये गुगल अर्थ इंजिन, आयओटी आणि ड्रोन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण मिळणार आहे . त्यास जागतिक बँक अर्थसाहाय्यत कृषी संशोधन परिषदेतर्फे हवामान, अद्यावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी , विज्ञान व तंत्रज्ञान यावर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे .
त्याचे बी टेक शिक्षण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे झाले असून सध्या तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एम टेक (अॅग्री ) च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे .या कामी त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील व कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रा. सुनील चव्हाण याचे प्रोत्साहन मिळाले.